Ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल राज्य सरकारने जानेवारी महिन्यामध्ये जाहीर केले होते. परंतु या छाननी दरम्यान लाडक्या बहिणीची संख्या कमी होण्याऐवजी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढताना दिसून आले आहे. जानेवारी महिन्यामध्ये पाच लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या आणि दोन कोटी 41 लाख लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला होता. त्याचप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे अनुदान देताना लाडक्या बहिणीची 2 कोटी संख्या 47 लाख इतकी झाली. यामुळे योजनेची पडताळणी ठप्प झाली अशी चर्चा सुरू आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना तपशील
घटक | माहिती |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
योजना कधी सुरू झाली | जुलै 2024 |
योजना कोणी सुरू केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेत मिळणारी रक्कम | दरमहा ₹1500 रुपये |
पात्रता | लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे |
लाभार्थी महिला | महाराष्ट्राची रहिवासी असावी |
वयोमर्यादा | 21 वर्षे ते 65 वर्षे |
अधिकृत वेबसाईट | लाडकी बहीण योजना |
Ladki bahin yojana: कधीपासून सुरू झाली? आणि आतापर्यंत किती पैसे मिळाले?
मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना” सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये सरकार द्वारे महाडिबीटी DBT प्रणालीमार्फत जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते मिळाले आहे म्हणजेच एकूण रक्कम 13,500 रुपये इतके त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या अगोदर सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता परंतु निवडणूक झाल्यानंतर, देवेंद्र फडवणीस यांनी असे घोषित केले की अर्जाची पडताळणी केली जाईल आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळेल अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर जानेवारी मध्ये पडताळणी दरम्यान 5 लाख लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र ठरले. आणि 2 कोटी 41 लाख महिलेंना अनुदान वाटप करण्यात आले.
पडताळणी केल्यानंतर महिलांची संख्या कमी होईल असे वाटत असताना, जागतिक महिला दिनानिमित्त जे हप्ते वाटप करण्यात आले होते लाडक्या बहिण योजनेचे त्यामध्ये लाडक्या बहिणीची संख्या दोन कोटी 47 लाख इतकी होती, गेले तीन महिने लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी बंद असल्यामुळे सरकारला आता एप्रिल महिन्यात दोन कोटी 47 लाख लाडक्या बहिणींना अनुदान द्यावे लागणार आहे..