Dr. Babasaheb Ambedkar Guru: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन व्यक्तींना मानले होते आपले गुरु जाणून घ्या येथे

Dr. Babasaheb Ambedkar Guru: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानणारे लोक कोट्यावधी आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोणाला आपले गुरु मानतात? याबाबतचा उल्लेख त्यांचा आत्मचरित्र यामध्ये आहे. माझी आत्मकथा या आत्मचरित्राची गाथा मी कोणामुळे घडलो हे त्यामध्ये मांडले आहे. सविस्तरपणे आपण जाणून घेऊया.

Dr. Babasaheb Ambedkar Guru: डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे गुरु कोणते?

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज जन्म निमित्त सर्व देशांमध्ये उत्साह साजरा केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान नाही तर अनेक असे कामे त्यांनी केलेले आहे.

तसेच अर्थशास्त्रज्ञ, राजकीय तज्ञ आणि समाज सुधारक म्हणून देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानले जाते. तसेच त्यांनी दलित बुद्ध चळवळीला देखील प्रेरणा दिली. आणि समाजातील भेदभाव नष्ट करण्याच्या चळवळी उभारल्या. त्याचबरोबर त्यांना आधुनिक भारताचे निर्माते देखील म्हटले जाते.

Dr. Babasaheb Ambedkar: कोणाला म्हणतात गुरु?

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुरू मारणारे कोट्यावधी लोक आहेत. मात्र स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला  गुरु मानतात ? त्याबाबत उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेला आहे.

“माझी गाथा” या आत्मचरित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपण कोणामुळे घडलो हे त्या गाथांमध्ये लिहिले आहे. आपल्या जीवनात कोणामुळे दृष्टी मिळाली. आणि आपले गुरु कोण आहे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

तर त्यांनी बुद्ध कबीर आणि महात्मा फुले यांना आपले गुरु मानले आहे. हे त्यांचे तीन गुरु होते. या व्यक्तींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला.

Dr. babasaheb ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू: शिक्षक बुद्ध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती आणण्याचे पहिले श्रेय गौतम बुद्ध यांना दिले आहे. कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी गौतम बुद्ध यांचे चरित्र लिहिले होते. कृष्णाजी यांनी एका समारंभामध्ये डॉक्टर गौतम बुद्ध यांचे चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेट दिली होती.

गौतम बुद्ध यांचे चरित्र वाचून ते भारावले होते. त्यांनी या अगोदर रामायण महाभारत अशा पुस्तकांचे वाचन केले होते. आणि यावरील त्यांचा विश्वास उडाला होता. आणि मी गौतम बुद्ध यांचा अनुयायी झालो. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दुसरे गुरु: कबीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात. माझे दुसरी गुरु संत कबीर आहे. कारण की त्यांच्या मनामध्ये कुठल्याही व्यक्तीचा भेदभाव नव्हता. संत कबीर हे खऱ्या अर्थाने महात्मा होते. मी महात्मा गांधीजींना मिस्टर महात्मा गांधी म्हणतो. त्यामुळे मला खूप पत्र यायचे. त्यामध्ये अशी विनंती होती की तुम्ही मला महात्मा गांधी म्हणून पत्र लिहत जा. आणि महात्मा गांधी म्हणून बोलावे. तर मी त्यांच्या विनंतीला महत्त्व दिलं नाही. कारण की मला संत कबीर यांची शिकवण लोकांपुढे मांडायची होती.

तिसरे गुरु: महात्मा ज्योतिबा फुले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांनी आपले तिसरे गुरु म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना मानले होते. मला महात्मा ज्योतिबा फुले यांचे मार्गदर्शन मिळाले. ज्योतिबा फुले यांच्यामुळे देशात पहिली मुलींची शाळा उघडली. तथागत गौतम बुद्ध कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिकवणीमुळे माझे जीवन उघडले आहे. अशी डॉक्टर बाबासाहेब यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेले आहे.

Leave a Comment