Heavy rain forecast :राज्यातील या जिल्ह्यामधे पुढील तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज , तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट .

Heavy rain forecast : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पंजाबराव डख आणि हवामान अंदाज विभागाने
पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिला आहे.

Heavy rain forecast : भारतीय हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट  दिला आहे तर जाणून घ्या ?

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण दिसायला सुरुवात झाली आहे आणि काही भागांमध्ये  उन्हाच्या कडकड्यासह सोसाट्याचा वारा सुटायला सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागाने आणि पंजाबराव डख यांनी महत्वपूर्ण हवामान अंदाज दिला आहे .

तसेच विदर्भामध्ये जसे नागपूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये विजेच्या गडगडांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसांमध्ये दिला आहे .

हे ही वाचा : https://trendnews.swaramh21.com/ladki-bahin-yojana/

Heavy rain forecast : राज्यामध्ये उन्हाचा तफावत दाब आणि दुसरीकडे हलक्या पावसाचा अंदाज .

राज्यामध्ये उन्हाचा तडाखा एक मार्चपासून वाढलाच आहे तर काही भागामध्ये तापमान 38° सेल्सियसच्या पार गेला आहे.   उन्हाचा पारा वाढला असून उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे . यामध्येच भारतीय हवामान विभाग (IMD)  पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकाची सोंगणी 70% झाली आहे तर काही शेतकऱ्यांची  20% रब्बीची
सोंगणी बाकी आहे . या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची राहिलेली पिकांची सोंगणी तात्काळ पूर्ण करावी असं भारतीय हवामान विभागाने सांगितले आहेत.

हवामान विभागाने मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर  ( औरंगाबाद) नांदेड बीड  हिंगोली परभणी या भागामध्ये ढगाच्या गडगडांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिला आहे.

विदर्भातील काही भागांमध्ये तसेच जळगाव अमरावती अकोला नंदुरबार धुळे अकोट गडचिरोली गोंदिया या भागामध्ये वादळी वाऱ्याचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 48 तासांमध्ये हवामान विभागाने वर्तविला आहे.

20 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा मराठवाडा विदर्भ खानदेश या काही भागामध्ये पंजाबराव डख आणि हवामान खात्याने वर्तविला आहे. या अंदाजानुसार राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रब्बी पिकाची कापणी करून पटकन घरात आणावे .

Heavy rain forecast : पुढील दिलेल्या प्रमाणे राज्यातील तापमानाची नोंद !

  • मराठवाडा तापमान : 29 ते 37 अंश सेल्सियस .
  • विदर्भ तापमान : 28 ते 38 अंश सेल्सियस.
  • खानदेश तापमान : 29 ते 38 अंश सेल्सिअस.
  • पश्चिम महाराष्ट्र तापमान : 30 ते 37 अंश सेल्सिअस.
  • कोकण विभागातील तापमान : 27 ते 35 अंश सेल्सियस.

Heavy rain forecast : शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसामध्ये आपल्या पिकाची काळजी घ्यावी.

मागील वर्षी 1 ते 15 मार्च  2024 च्या दरम्यान अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती मात्र यंदाच्या वर्षी म्हणजे 19 मार्चपासून ते 25 मार्च पर्यंत अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार.

दिलेला हवामान अंदाज किती खरा ठरतो पाहण्यासारखे परंतु , तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी सोंगणी झालेली पिकांची काळजी घ्यावी, आपल्या पिकाला झाकून ठेवावे. वरती दिलेला अंदाज हवामान व्यक्त केला आहे.

Leave a Comment