Ladki bahin yojana: प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी! या महिलांचे ₹1500 रुपये होणार बंद!

Ladki bahin yojana: महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेत लाडक्या बहिणींना टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व पात्र असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे असे सांगितले आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. परंतु आतापर्यंत ही पडताळणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्या महिलांची पडताळणी राहिलेली आहे अशा सर्व महिलांची पडताळणी सुरू राहणार आहे. अजून यासाठी काही कालावधी लागणार आहे.

Ladki bahin yojana: लाडकी बहीण योजना

  • 1. योजनेचे नाव-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • 2. कोणी सुरू केली-माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • 3. योजनात मिळणारी रक्कम-दरमहा 1500 रुपये
  • 4. उद्देश-महिलांना आर्थिक सहाय्यक
  • 5. योजनेची पात्रता-2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला
  • 6. अर्ज प्रक्रिया -ऑनलाईन ऑफलाइन
  • 7. अधिकृत वेबसाईट – लाडकी बहीण योजना

लाडकी वहिनी योजनेच्या अर्जाची तपासणी:(ladki bahin yojana application verification)

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी ही पाच टप्प्यांमध्ये केली जात आहे. त्यामध्ये पात्र असलेल्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्नाची तपासणी आतापर्यंत झालेली नाही. लवकरात लवकर ही तपासणी ही पूर्ण होईल असे सांगितले गेले आहे. नंतर ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील अशा महिलांचे अर्ज केले जाणार आहे.

Ladki bahin yojana: कोणत्या महिलांचे अर्ज होणार बाद?

आतापर्यंत लाखो लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. यामध्ये ज्या महिलांकडं चार चाकी वाहन आहे अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत आणि त्यांनी चुकीचे कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतात अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.

9 लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज या योजनेतून रद्द करण्यात आले आहे. आणि हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे 50 लाखापेक्षा जास्त महिलांच्या आज रद्द करण्यात येणार आहे अशे सांगितले जाते.

सरकारचा मोठा निर्णय:  

ज्या महिलांनी लाडके बहिण योजनेचे अटी आणि नियमाचे पालन नाही केले अशा महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे. त्या महिलांना यापुढे कधीच 1500 मिळणार नाही. काही महिलांना मागच्या दोन महिन्यापासून लाडकी वहिनी योजनेचे पैसे दिले जात नाही ‌. या महिलांचे अर्ज आधीच बाद केले आहे. या कारणामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणे बंद झाले आहे.

अजूनही बऱ्याच महिलांच्या अर्जाची पडताळणी बाकी आहे ती पण त्यांनी लवकरच पूर्ण होईल आणि लाडकी बहीण योजनेच्या अटी व नियमानुसार ज्या महिला या योजनेत पात्र असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेत न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून बाद केलं जाईल.

Leave a Comment