भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ४ दिवस पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहेत. काय आहे सविस्तर बातमी लेखांकनामध्ये बघूया.
Maharashtra rain alert: हवामान अंदाज महाराष्ट्र.
महाराष्ट्र राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणात मध्यम ते जास्त स्वरूपाचा तापमानाचा पारा दिसून आला आहे. मराठवाडा आणि विदर्भ दक्षिण महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भामधील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काल पाहायला मिळाला होता, परंतु आता अमरावती, अकोला, भंडारा, जळगाव, या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील ४ दिवसात आपल्याला तुरळक ठिकाणी दिसेल. दमट हवामान मध्ये आज कडेकेचा ऊन राहील आणि उद्यापासून पावसाला सुरुवात होईल.
कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे या काही जिल्ह्यामध्ये शुक्रवारी उष्ण व दमट हवामान मध्ये तापमान कोरडे राहील परंतु शनिवारपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवस दिसायला मिळेल.
Havamn andaj : मराठवाडा हवामान अंदाज.
शेतकरी मित्रांनो मागील काही आठ दहा दिवसापूर्वी आपल्याला मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला होता. परंतु आता पुन्हा ढगाळ वातावरणासह शुक्रवारीपासून मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ), हिंगोली, बीड, नांदेड, परभणी, बीड या काही भागांमध्ये उष्णतेसह दमट हवामान मध्ये, ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चार दिवस दिसेल.
मराठवाड्यातील हवामान अंदाजानुसार तापमान ३१ ते ३९ सेल्सिअस असेल. जास्त तापमानामध्ये पुढील दिवसांमध्ये भारतीय हवामान अंदाजानुसार हलक्या पावसाची शक्यता दाट आहे. आज ठीक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान दिसेल.
Maharashtra state temperature : राज्यातील तापमानाची नोंद.
- मराठवाडा तापमान – ४०° च्या वर
- विधर्भ तापमान – ४३ ° च्या वर
- पश्चिम महाराष्ट्र तापमान- 38° च्या वर
- कोकण विभाग तापमान – 37° च्या वर
राज्यातील तापमान पुढील आठ दिवसानंतर आणखी झपाट्याने वाढणार आहेत. तर त्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान अंदाज यांनी व्यक्त केला आहे.
सांगली सातारा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विजेच्या गडगडासह दमट हवामाना मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्यापासून आणि काही भागांमध्ये आजपासून पण दिसतो. शेतकरी बंधूंनो तुम्ही तसेच कांदा, गहू, मका राहिलेली पीक लवकरात लवकर काढून घेणे अन्यथा नुकसान होऊ शकते.